0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे

मीरा भाईंदर शहर हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. या शहराच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वोतोपरी सहाय्य करण्याबरोबरच विकास कामांसाठी पुरेसा निधी कुठलाही भेदभाव न करता उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले. मीरा भाईंदर येथील विविध विकासकामांचे ई-भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.यामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनाचा भूमिपूजन, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मैदानावर उभारलेल्या कोविड रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा तसेच मीरा-भाईंदर RTPCR कोविड-19 टेस्टिंग लॅबचे लोकार्पण आणि काशिमीरा, प्रभाग-14 येथील BSUP प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने MMRDA मार्फत कर्जस्वरुपात दिलेल्या निधीचे महानगरपालिकेला समर्पण या कार्यक्रमांचा समावेश आहे.या कार्यक्रमास नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, आमदार रवींद्र फाटक, महापौर ज्योत्स्ना हसनाळे, आयुक्त विजय राठोड, मनपा लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top