web-ads-yml-728x90

Breaking News

मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील पात्र मतदारांनी नाव नोंदणी करण्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांचे आवाहन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून दि. 17 नोव्हेंबर, 2020 ते 15 ‍डिसेंबर 2020 या कालावधीत हरकती व दावे स्वीकारण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत ज्या मतदारांची मतदार म्हणून नोंदणी झाली नाही आणि ज्यांचे वय दि. 1 जानेवारी 2021 रोजी 18 वर्ष पूर्ण होत आहे त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट होणे आवश्यक आहे त्यांनी फॉर्म 6 भरुन द्यावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.मयत व स्थलांतरीत मतदार असतील त्यांचा शोध घेण्यात येऊन त्यांची नावे मतदार यादीतून कमी करावयाची आहेत. त्यासाठी फॉर्म 7 भरुन द्यावयाचा आहे. तसेच मतदार यादीत नाव, वय, लिंग या बाबी चुकीच्या नोंदविल्या असतील त्यामध्ये दुरुस्ती करावयाची आहे. यासाठी फॉर्म 8 भरुन द्यावयाचा आहे.

No comments