web-ads-yml-728x90

Breaking News

पत्रकार अविनाश पाठक यांच्या पुस्तकांचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक  अविनाश पाठक यांनी लिहिलेल्या ‘सत्तेच्या सावलीत’ आणि ‘दृष्टिक्षेप’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते दूरदृष्य माध्यमातून झाले.अविनाश पाठक यांचे ‘सत्तेच्या सावलीत’ हे पुस्तक राजकारणाच्या रंगमंचावरील पडद्यामागील कथांचे संकलन तर ‘दृष्टिक्षेप’ हे पुस्तक वैचारिक प्रासंगिक लेखाचा उत्कृष्ट संग्रह आहे असे नमूद करून पुस्तकांच्या माध्यमातून वाचकांचे वैचारिक प्रबोधन होईल, असे मत राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केले.

No comments