web-ads-yml-728x90

Breaking News

आरोग्य अधिकारी डॉ.श्रीधर बनसोडे यांना बडतर्फ करण्यासाठी मुख्यमंत्री,आरोग्यमंत्री यांना पत्रकार कुणाल शेलार यांचे पत्र

BY - विशेष प्रतिनिधी, युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |

मुरबाड तालुक्यातील बोगस डॉक्टरांची चौकशी अद्दयापही धूळखात पडून असून आरोग्य अधिकारी यांच्या पाठिराख्याने बोगस डॉक्टरांची मोठया प्रमाणात चांदी होत आहे.अनेक तक्रारी होतात अनेक अर्ज येतात परंतू डॉ.श्रीधर बनसोडे यांची कार्यवाही होत नाही.डॉक्टरांची चौकशी करणेकरिता मुख्यमंत्री महोदय,ठाणे जिल्हाधिकारी यांचेकडून चौकशी करण्याचे आदेश असताना चौकशी बनावट पध्दतीची करून तक्रारदाराच्या तक्रारीवर तडजोड करून तक्रारी अर्जाला विस्तृत स्वरूप म्हणून घोषित करून अर्ज निकाली काढले जाते.गेल्या अनेक महिन्यांपासून बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट हा मुरबाड तालुक्यात चालू असून कोणत्याही स्वरूपात आरोग्य अधिकारी डॉ.श्रीधर बनसोडे दखल घेतली गेली नाही.जुन्या आढाव्याच्या फार्इली चालू तारखेच्या शिक्क्याने अर्जदाराला देऊन थतूर मातूर उत्तरे देऊन मोठया प्रमाणात बोगस डॉक्टरांकडून साटेलोटे केले जात असल्याची शंका आहे.अशा आरोग्य अधिकारी डॉ.बनसोडे यांची मंत्रालयीन स्वतंत्र पथक नेमून त्यांच्यावर कारवार्इ करून त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी पत्रकार कुणाल शेलार यांनी लेखी स्वरूपात राज्याचे पारदर्शक मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री तसेच ठाणे जिल्हाधिकारी यांना केली आहे.अनेक वेळा तक्रारी झाल्या अनेक चौकशीचे पत्र डॉ.बनसोडे यांना आले परंतू बोगस डॉक्टरांवर कोणतीही कार्यवाही झाली नाही.बोगस डॉक्टरांच्या गंभीर विषयाला ठाणे वरिष्ठ अधिकारी लक्षात कधी घेतले गेले नसल्याने आरोग्य अधिकारी डॉ.बनसोडे हे बोगस डॉक्टरांचे पाठिराखे झाले असल्याने आजपर्यंत कोणतीही चौकशी अंतिम बोगस डॉक्टरांच्या तक्रारीला पुर्णविराम मिळाले नाही.दवाखाना एकाच्या नावावर तर चालविणारा दुसरा असतो.सदरचा हा प्रकार आरोग्य अधिकारी डॉ.बनसोडे यांना आणून दिले असतानाही कोणतेही प्रशासकीय पाऊल उचलले नाही.मुरबाडच्या बनावटी तसेच बोगस डॉक्टर अलीकडे कोरोना योध्दा म्हणून वावरत आहे परंतू मुळःत तो डॉक्टर तरी खरा आहे की नाही याची चौकशीही मुरबाड आरोग्य अधिकारी डॉ.बनसोडे यांनी केली नाही.प्रशासकीय भय ही डॉक्टरांमध्ये राहिली नसून साटेलोटे करणारे आरोग्य अधिकारी डॉ.बनसोडे यांची गरजच काय मग अशा मुरबाडला त्यामुळे त्यांची त्यांना तात्काळ बडतर्फ करावे अशी मागणी कुणाल शेलार यांनी मुख्यमंत्री,आरोग्यमंत्री,ठाणे जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

          आज मुरबाड तालुक्यात साप,विंचू,कावीळ तसेच अन्य किटकांमुळे नागरिकांचा जीव हा गेला आहे परंतू शासनाची मिळणारी रक्कम 10 लाखाची ती डॉ.बनसोडे यांनी मिळवून दिली नाही.अशातच माहिती मागितली असता आमच्याकडे डॉक्टरांकडून माहिती मिळत नाही असे सांगण्यात आले तेव्हा कुणाल शेलार यांच्या पाठपुराव्यामुळे त्यांनी सर्व डॉक्टरांना नोटीसी काढल्या होत्या परंतू साटेलोटे करून त्यावरही डॉक्टरांचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला नाही.अशा हलगर्जी आणि निष्काळजीपुर्वक तसेच प्रशासनाचे भय निर्माण न करणारे आरोग्य अधिकारी मुरबाडमध्ये कशाला ? ज्या आरोग्य विभागात एक शिपार्इ सुध्दा कामाला नाही तेथील कर्मचारी वर्गाला झाडू मारून साफसफार्इ करावी लागत आहे तेथे आरोग्य अधिकारी कशासाठी ? कागदी घोडविणारे आरोग्य अधिकारी डॉ.बनसोडे यांना ठाणे येथील बोगस कमिटी वरिष्ठ अधिकारी पाठिशी घालत असून मोठया प्रमाणात हप्ते तर त्यांना दर महिणा देत नसेल ना असा सवाल आज केला जात आहे त्यामुळे शासनानी निर्भिड प्रशासक द्दयावे जेणे करून बोगस डॉक्टरांवर आळा घालून बोगस डॉक्टराच्या विषयाला पूर्णविराम देता यर्इल अन्यथा नागरिक मरत राहतील परंतू शासनाची मदत ही केवळ जी.आर वरच राहिल त्यासाठी शासनाने आतातरी जागृत व्हावे पहिलेच्या सरकारामध्ये जी ताकद सखोल चौकशी आणि नायक भुमिकेची होती ती याच सरकारने मुरबाड आरोग्य अधिकारी डॉ.श्रीधर बनसोडे यांची चौकशी करण्याचे आदेश देत बडतर्फ करून दाखवावे असा सल्लाही कुणाल शेलार महाराष्ट्र शासनाला दिला आहे. 

No comments