0

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

महिलांच्या विकासाला बळ देण्याची आवश्यकता असून महिला विकासाच्या योजना कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरणे गरजेचे आहे. यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आपली भूमिका असून मुख्यमंत्री कार्यालयात महिलांचे प्रश्न आणि समस्या तसेच त्यांच्यासाठीच्या योजनांना गती देणे आणि सध्याच्या योजनांतील अडचणी दूर करणे, नवीन योजना आखणे यासाठी विशेष कक्ष राहील, असे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी सांगितले.महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीस मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह,  प्रधान सचिव विकास खारगे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) अध्यक्षा श्रीमती ज्योती ठाकरे, जल जीवन मिशनच्या संचालक श्रीमती आर विमला, माविमच्या महाव्यवस्थापक श्रीमती कुसुम बाळसराफ, माजी महापौर विशाखा राऊत, श्रीमती गीता कांबळी, श्रीमती संगीता हसनाळे,  श्रीमती रंजना मेवाळकर आदी उपस्थित होते.

 

Post a comment

 
Top