web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड मध्ये मटका,गुटखा,दारू धंद्दयांना वेग ; पोलिस प्रशासन सुस्त...

BY - कुणाल शेलार, युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |

मुरबाडमध्ये गेल्या काही वर्षापासून मटका,गुटखा,दारूच्या धंदयांनी वेग धरला असून याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.मुरबाड शहरात अनेक ठिकाणी मटक्याच्या आकडयांची संख्या तर गुटखा डिलरच्या वारसानी हौदास घातला असून यावर प्रशासनाचे वचक राहिले नाही.एखादी बातमी आली की,मटका आणि गुटखा दोन ते तीन दिवस बंद करण्यास सांगितल्याचे चिन्ह घुमु लागते.कालपर्यंत जे अवैध धंदे लपून केले जात होते ते आज उघडपने केले जात असतानाही कोणतीही कारवार्इ केली जात नाही.अवैध धंदयांवर बंदी घालण्याऐवजी पोलिस प्रशासन त्यांचे कवच बनले आहेत.मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांना तक्रार करूनही कोणतीही चौकशी करण्यात येत नाही.अधिकारी वर्गांशी साटेलोटे केल्याने आज मुरबाड मध्ये मटका,गुटखा,दारू च्या धंद्दयांना वेग आला आहे.पोलिस प्रशासनांना सांगितल्यावरच अवैध धंदे दिसतात परंतू तसे अवैध धंदे आजपर्यंत तरी दिसून आले नाही.कोणी तक्रार करेल तेव्हाच प्रशासन पाऊल उचलते तशी पाऊले कधी उचलतांना आढळून आले नाही.मटका,गुटखा अवैध धंदेवाल्यांकडून साटेलोटे केल्याने तर कारवार्इचा बडगा उचलला जात नाही ना अशी शंका आता नाकारता येणार नाही.          सध्या मुरबाड शहरातून गुटखा धंदा तालुक्यामध्ये पार्सल म्हणून चालविला जात आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदेश तर दिलेत परंतू मुरबाडच्या गुटखा विक्री डिलरवर कारवार्इ न करता कोणतीही चौकशी न करता त्यांच्या आदेशाला केराची टोपली मात्र दाखविली आहे.मुरबाड शहरात नायक प्रशासक नसल्याने अवैध धंद्दयाला वेग आला आहे.पहिले पहिले पाकोळीचा धंदा तेजीत चालायचा आणि आता मटका,गुटखा धंदा तेजीत चालत आहे.बातम्या येऊनही हलगर्जीपणा करणारे प्रशासक सुस्त झाले असून कोणतीही दखल घेत नाहीत.गोपिनीय माहिती देऊनही कोणतीही कारवार्इ करित नाहीत,पेट्रोलिंग मध्ये कसा का नाही मटका,गुटखा विक्री भेटत असा प्रश्‍न समोर आला आहे.जिथं पोलिसांचे भय पाहिजे तिथं पोलिसच पाठिराखे झाले असे म्हणायची वेळ येऊ लागत आहे.वरिष्ठ अधिकारी बातमी वाचून सोडून देतात परंतू दखल घेत नाही,खालील अहवालात कोणताही अवैध धंदा मोजला जात नाही मग कार्यवाहीची गिनती कशात करावी आणि वचक कसे सिध्द होऊ शकेल असे म्हणायला हरकत नाही.मागील बातमीत सर्व माहिती हि गुटखा डिलरची प्रसिध्द केली असता मुरबाड पोलिसांनी कोणतीही चौकशी केली नाही.परंतू वरिष्ठ अधिकारी यांनीही कोणती दखल गांभिर्यतेने घेतली नाही.बातमी टाकल्यास साहेब हप्ते घेण्यास जात नाही असे सांगितले जाते परंतू हप्त्याचा विषय हा त्या पोलिसांकडूनच समोर आल्याने त्यावरून निष्कर्ष काढणंही आज अवघड पडलं आहे.जर साहेब हप्ते घेत नाहीत तर मटका,गुटखा,दारूचे धंदे खुलेआम केले जाते त्यांचेवर कारवार्इ का केली जात नाही असा सवाल मात्र केला जात आहे.मुख्यमंत्री यांना सदरची तक्रार केली असता संबंधित विभागाला कळविण्यात येते परंतू संबंधित विभाग कोनतीही कार्यवाहीचे पाऊल का उचलत नाही,ज्यांचे विरोधात तक्रार असते त्यांचेकडेच चौकशी अंतिम अहवाल सादर करण्यास सांगितल्यावर स्वतः दोयी असल्याचे कसे कोणी सांगेल यामुळे अधिकारी हा बदलतो पण अवैध धंदेवालेचे काय ? त्याने थान तर मांडलेच आहे त्यांचेवर कोण कारवार्इ करणार अशा अनेक प्रश्‍नांना पेव फुटले असून मुरबाड मधील मटका,गुटखा,दारू धंदा केव्हा बंद होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.पोलिस प्रशासनाने जागृत असल्याचे पुरावे म्हणून मटका,गुटखा,दारू धंदा पुर्णतः बंद केल्यावर सिध्द करून दाखवा अशी ओरडही उमटू लागली आहे.

          गेल्या 2 ते 3 वर्षापुर्वी उपनिरीक्षक पंकज गिरी,उपनिरीक्षक रमेश गायकवाड,उपनिरीक्षक अंधारे मॅडम,पो.शि.राहूल दाभाडे,नितीन मांडोळे,व अन्य पोलिस प्रशासकांनी गुटखा,मटका अवैध दारू धंदेवाले यांचेवर बेधडक कारवार्इ करून चांगलाच चाप बसविला होता परंतू त्यांच्या बदलीनंतर पुन्हा अवैध धंदेवाले यांनी आपले डोके वर काढल्याने गुटखा,मटका,दारूवाले यांचेवर कारवार्इ करण्यात आत्ताचे मुरबाड पोलिसांना अपयश आले आहे.


No comments