web-ads-yml-728x90

Breaking News

१०० पासून १ पर्यंत सर्व आकडे उलट्या क्रमाने केवळ ३८ सेकंदात

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे

पुणे जिल्ह्यातील पिंपरी चे सुपुत्र अमित देशमुख या ३८ वर्षीय तरुणाने १०० पासून १ पर्यंत सर्व आकडे उलट्या क्रमाने केवळ ३८ सेकंदात बोलुन पूर्ण केल्याने नुकतीच आसाम बुक ऑफ नॅशनल व गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्याच्या या आगळ्यावेगळ्या रेकॉर्डने पिंपरीसह पुणे जिल्ह्याची शान वाढली असून अमितचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा पूर्ण केलेला अमित देशमुख सध्या पिंपरी-चिंचवड येथे राहत असून चाकण येथील कंपनीमध्ये काम करत आहेत.लहानपणापासूनच विविध प्रकारचे छंद जोपासण्याची आवड आहे. नाविन्यपूर्ण आणि आव्हानात्मक कौशल्ये प्राप्त करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांची आसाम बुक ऑफ नॅशनल व पाठोपाठ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली.हे दोन्ही पुरस्कार त्यांनी केलेल्या विशेष कार्य म्हणजे १०० ते १ उलटे आकडे तेही फक्त ३८ सेकंदात पूर्ण केल्यामुळे मिळाले आहेत.केवळ दोन वर्षांपूर्वी पासूनच वेगवेगळे छंद जोपासायचे, नवनवीन उपक्रम राबविणे व फिरण्याच्या छंदामुळे बौद्धिक क्षमतेचा विकास होत असल्यामुळे सध्या सुई बोटातून आरपार करणे,आगीचा गोळा तोंडात टाकणे,काचेवर चालणे आदींसारखी कौशल्य प्राप्त झाल्याचे अमित देशमुख यांनी सांगितले.आसाम बुक ऑफ रेकॉर्ड यांनी त्यांच्या कामगिरी आणि विशेष कौशल्याचे कौतुक केले तसेच या कामगिरीबद्दल नॅशनल रेकॉर्डचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

No comments