आमदार किसनराव कथोरे यांच्या प्रयत्नांना यश ; मुरबाड तालुक्यातील बस वाहतूक सेवा पुन्हा झाले सुरू,पुन्हा दिसणार गावात लालपरी
BY - कुणाल शेलार , युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
कोरोना
प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग ठप्प झाले होते परंतू अलीकडे कोरोना प्रादुर्भाव हा कमी
होतांना दिसून येत आहे.प्रथम ग्रामीण भागात कोरोना प्रादुर्भाव शिरकाव नव्हता कालांतराने
कोरोना प्रादुर्भाव ग्रामीण भागात येऊन पोहोचला तो वाढू लागला तेव्हा कोरोनामुक्त ग्रामीण
भाग करण्याचा निश्चय बाळगला तेव्हा या निश्चियाला खरंच यश प्राप्ती झाली.
ठाणे जिल्हयात कोरोना प्रादुर्भावात कमी
टक्क्याची साखळी दिसायला लागली आहे.त्यातच मुरबाड सारख्या ग्रामीण भागात कोकणाचे आधारस्तंभ,ठाणे
जिल्हयाचे पालकत्व तसेच मुरबाड विधानसभेचे आमदार किसनराव कथोरे यांनी कोरोनाची हकालपट्टी
करण्यासाठी युक्ती आणि शक्तीपणाला लावली त्यांच्या युक्ती शक्तीमुळे आज मुरबाड तालुक्याचा
कोरोनाची संख्या शुन्यावर आली आहे.त्यामुळे लॉकडाऊनमुळे विस्कीळीत अस्अणारी सेवा ही
पूर्वपथावर पुन्हा नव्या जोमाने सुरू होतांना दिसत आहे.
दिवाळी सणावर धामधूम आणि कोरोना प्रादुर्भाव
पाहता माजे कुटूंब आणि माझी जबाबदारीतून कोरोनाचे नियम पाळून ग्रामीण भागातील बस वाहतूक
सेवा ही पुन्हा सुरू झाल्या असून दिवाळी सणासाठी मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागाच्या
जनतेला,शेतकरी,व्यापारीवर्गाला आणि कामगार वर्गाला मोठया प्रमाणात फायदा हा होणार आहे.
कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने मुरबाडची
दुकाने उघडली,बाजारपेठा सजल्या,तरीही आपण आपली व आपल्या ग्राहकांची काळजी घेणे अत्यंत
गरजेचे असून शासनाच्या नियमावलीने मास्क,सॅनिटायजरचा वापर करून शारिरीक अंतर राखून
दिवाळी सण साजरा करत आपली परंपरा आणि आपला सण साजरा करावा त्याचबरोबर बस वाहूतक सेवा
ही पुर्णतः सुरू केली असून पुन्हा गावात लालपरी दिसणार आहे तरीही सर्व नागरिकांनी शासनाच्या
नियम अटीचे पालन करावे,प्रशासनाला सहाकार्य करावे असे आवाहनही आमदार किसनराव कथोरे
यांनी केले असून त्यांच्या विकास व विचारशैलीला सर्व स्तरातून नागरिकांनी आभार मानले
आहेत.
सर्व नागरिकांनी आपली व आपल्या कुटूंबाची
जबाबदारी घेऊन काळजी घ्यावी त्याचबरोबर दिवाळी सण आनंदी,उत्साहाने साजरी करावे असा
संदेश देत तमाम बंधू भगिनींना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments