web-ads-yml-728x90

Breaking News

आग विझविण्यात अग्निशमक दलातील जवानांना आले यश ; मुरबाड नगरपंचायतीचे मानले आभार

 

BY - विशेष प्रतिनिधी, युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |

मुरबाड शहरातील सारिका हॉटेल मागे एका व्यक्तीने आग लावली असता त्या आगेचा भडका आजूबाजूच्या ठिकाणी पसरला असल्याने जवळील असणारे शेतकरी रघूनाथ पष्टे व त्यांचे चिरंजीव मोहन पष्टे त्याच बरोबर त्यांचे सहकारी यांनी वाढत्या आगीची ओढ इतर परिसरात जाण्याचे पाहतांना दिसताच घटनास्थळी आग विझविण्यासाठी धाव घेतली परंतू आगीचे तांडव पाहता आग विझविता आली नाही व आग आटोक्यात आली नव्हती तेव्हा तात्काळ पत्रकार कुणाल शेलार यांना फोन केले असता कुणाल शेलार यांनी मुरबाड नगरपंचायतीला कळविले असता नगरपंचायतीचे अधिकारी /कर्मचारी संदीप तेलवणे यांनी तात्काळ अग्निशमक दलाच्या विभागात कळविले असता घटनास्थळी काही सेकंदात अग्निशमक दलातील जवान व आपत्कालीन अ‍ॅम्ब्युलन्ससमवेत तात्काळ उपाययोजना यंत्रणा तेथे हजर झाले व आग विझविण्यात अग्निशमक दलातील जवानांना मोठे यश आले.सदरहू ही आग कशी आणि कोणी लावली,कशासाठी लावली हे अद्दयाप तरी सिध्द झाले नसून घटनेचा पंचनामा करित तेथील असणारे शेतकरी यांचे जबाब घेण्यात आले.आग पाहिली नसती तर आगीचे सावट आजू बाजूच्या शेतांना जळून खाक करून टाकले असते व तेथील जनावरांचा जीवही गेला असता परंतू तसे न होता जागृत असणारे मुरबाड नगरपंचायत,अग्निशमक दल,आपत्कालीन यंत्रणा तात्काळ आल्याने आग आटोक्यात आली असून अतिदक्षतेचे माहेर घर म्हणून मुरबाड नगरपंचयतीचे अधिकारी/ कर्मचारी,अग्निशमक दलातील जवान, आपत्कालीन यंत्रणेचे जवान आपली जबाबदारी आणि कर्तव्य ही कोरोनामध्येही कोरोना योध्दा म्हणून कार्यरत आहे हे सिध्द झाले असून सर्व स्तरातून या आपत्कालीन योध्दांचे आभार मानले आहेत.

No comments