0

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - औरंगाबाद

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याच्या हक्काचे रोजगार आणि विधी विद्यापीठ विदर्भाला नेले. आज मात्र, ते मराठवाड्याची मते मागायला येत आहेत. त्यामुळे भाजपला या मराठवाड्याच्या मातीत असं गाडा की पुन्हा ते पदवीधरांची निवडणूकच विसरले पाहिजे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली. महाविकास आघाडीचे उमेदवार सतिश चव्हाण यांच्या प्रचारसभेला संबोधित करताना धनंजय मुंडे यांनी हा घणाघाती हल्ला केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मराठवाड्यात निवडणूक प्रचारासाठी येऊन गेल्याचं कळलं. फडणवीस आले तेव्हा मराठवाड्यातील तरुणांनी त्यांना रोजगार आणि विधी विद्यापीठा विषयी जाब विचारायला हवा होता. तुम्ही मुख्यमंत्री असताना आमचं विधी विद्यापीठ विदर्भात का नेलं? असा सवाल त्यांना करायला हवा होता. आज तुम्ही पदवीधरांसाठी मतं मागत आहात. पण आमचे उद्योग तुम्ही विदर्भाकडे का नेले? आमच्या हक्काचं जे जे होतं, ते विदर्भाला का दिलं? असा सवाल फडणवीस यांना विचारायला हवा होता, असं मुंडे म्हणाले.

Post a Comment

 
Top