web-ads-yml-728x90

Breaking News

पदवीधर सुशिक्षीतांनो आता तरी जागे व्हा आणि उघडा तिसरा डोळा - कुणाल शेलार

BY - विशेष प्रतिनिधी, युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |

महाराष्ट्राचा अविभाज्य भाग हा कोकण मानला जातो. याच कोकणातून सुशिक्षीतांचा आकडा हा वाढता आहे.अनेक जन पदवीधर झाले,अनेक जणांनी आपल्या बुध्दिने महाराष्ट्राच्या नकाशावर नाव उमटविले आहे.याच कोकणात जे ते सुशिक्षीतांनी सिध्द केले.महाराष्ट्रातून सर्वात जास्त पिके याच कोकणातून घेतले जाते.तसेच निवडणूकीत सुध्दा याच कोकणातून आमदार,खासदार निवडून सत्तेच्या गादीवर बसले परंतू हे सगळे होत असताना आमचा आमदार आमच्यासाठी काय करतो आणि काय केले यासाठी 5 वर्ष संपल्यानंतर निवडणूकी वेळी सुशिक्षीत मतदार हा गणित करित राहतो.वर्षे आले निवडणूका झाल्या परंतु निवडनूकीला उभा राहणार्‍या चेहर्‍याने आजपर्यंत कोकणाच्या सुशिक्षीत मतदार संघाला कधी मदत केली नाही.निवडणूका झाल्या रे झाल्या कि तो आमदार 5 वर्ष सुशिक्षीतांना विचारत सुध्दा नाही.आता ही तसेच होणार असून कोण चेहरा,कसला विकास याचा पहिले विचार सुशिक्षीत मतदारांनी करायला हवयं.निवडणूका लागल्या कि सुशिक्षीतांच्या मोबार्इलवर दर दिवसातून दोन ते तीन वेळा मॅसेज येतात परंतू ग्रामीण भागाच्या मतदार वर्गाला कोणती अडचण होती आणि आपण काय मदत करायला हवी आहे हे त्या कोकण पदवीधर मतदार संघातील आमदाराला जमलेच नाही.अनेक शो शार्इनिंग करून निवडणूका लढवितात आणि हे आणू ते करू,नोकर्‍या देऊ,विकास करू असे म्हणणारा 5 वर्षानंतर मताच्या भिकेने निवडणूक जिंकतो पण जिंकल्यानंतर फिरकत सुध्दा नाही.निवडणूकी वेळी मताची भिक मागणारा लाचार होतो पण गरिब पदवीधराला मदत करण्यासाठी कधी पुढाकार नाही होत.त्यासाठी कोकण पदवीधर मतदार संघातील युवकांचा रोष हा वाढू लागला आहे.नको तो पक्षाचा आणि नको राजकीय खेळणरा जुगारी आमदार जो स्वतःच्या स्वार्थासाठी दिलेल्या सुशिक्षीत मतदारांना दिलेल्या आश्‍वासनाची रांगोळी  करित असेल.त्यासाठी आता पदवीधर सुशिक्षितांनो आता तरी जागे व्हा आणि उघडा तिसरा डोळा असा सल्ला कुणाल शेलार यांनी सर्व कोकण पदवीधर मतदार संघातील तरूण तरूणींना दिला आहे.

          आज सुशिक्षीतांचा प्रश्‍न हा एैरणीवरच राहिला आहे.विविध पदवीधर सुशिक्षीतांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी युवा तरूणांनी पुढाकार घ्यावा या दृष्टिकोणातून तरूण वर्गाची फळी आज देशाच्या भविष्याची ढाल बनू राहत असून ग्रामीण भागाचा तरूण तरूणीने देशाच्या नकाशावर आपल्या कार्यशैलीने विकास करण्याचा मनोध्यय मनात बाळगला आहे त्यामुळे यंदाच्या पदवीधर निवडणूकीसाठी कोकण मतदार संघातून अनेक तरूणांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.अनेक तरूणांनी तर यंदा ग्रामीण भागाचा बुध्दिवान आणि होतकरू तरूणाला पसंती दाखवून एकजूट होऊन निवडणूकी लढविण्यासाठी सज्जता दाखविली आहे. कोकण विभाग मतदार संघात अनेक सुशिक्षीतांचे प्रश्‍न आजही धूळखात पडून असून पक्षाच्या जोरावर निवडणूक येणारे नेते निवडणूक झाल्यानंतर आपला तोंड दाखविण्यासाठी कधी आले नाही.जेथून निवडून गेले आणिं जिथून निवडणूक लढवून ज्या तरूणांनी विश्‍वास म्हणून साथ दिली अशा तरूणांच्या हाती पुन्हा निराशाच आल्याने यंदाच्या निवडणूकीला तरूण वर्ग चांगलीच चपराक दाखवतील यात शंका नाही.कोरोना प्रादुर्भावात तर तो आमदार गायबच झाला होता.जर पदवीधर सुशिक्षितांचा आमदार घाबरून ग्रामीण भागात येऊ शकला नाही तर तरूण वर्गांना दिलासा,मदतीचा हात द्दयायला आला नाही तर नको असा आमदार जो निवडणूकीत हॅट्रिक साठी पदवीधर सुशिक्षीतांच्या भावनांशी खेळत राहिल.त्यासाठी यंदाच्या 2020-21 च्या पदवीधर कोकण मतदार संघात ग्रामीण भागाच्या तरूणांनी पुढाकार घ्यावा आणि आपला मतदार संघाचा विकास तसेच सुशिक्षीतांचे गंभीर प्रश्‍न शासन दरबारी मांडून न्याय मिळवून मदतीचा हात द्दयावा यासाठी पुढे येण्याची हीच ती खरी वेळ आहे त्यासाठी कोणत्याही पक्षाला बघून आणि राजकीय नेत्यांचे समर्थक होऊन नये तर कोकणाचा विकास करण्याचा ध्येय बाळगणार्‍या ग्रामीण भागातील तुमच्यासाठी अर्ध्यारात्रीलाही एका फोनवर तुमच्या समस्याचे निराकरण करेल असा आमदार निवडा असे आवाहन कुणाल शेलार,अ‍ॅड किरण थोरात यांनी तमाम कोकण मतदार संघातील सुशिक्षीतांना केले आहे.


No comments