0

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

दिनांक ५ नोव्हेंबरपासून राज्यातील कंटेनमेंट झोनच्या बाहेरील जलतरण तलाव, योगा संस्था, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स आणि काही इनडोअर खेळांना सुरू करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी एका परिपत्रकाद्वारे ही माहिती देताना असे म्हटले आहे की, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी कंटेनमेंट झोनच्या बाहेरील जलतरण तलावांना परवानगी देण्यात येत आहे. यासाठी क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या मार्गदर्शक सूचना व निर्देश लागू असतील.प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर असलेल्या योगा संस्थांना पुनश्च सुरु करण्यासाठीही परवानगी देण्यात येत असून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना लागू राहतील.

Post a comment

 
Top