कोरोना काळात पडद्यामागील कलाकारांना मदत केल्याबद्दल प्रशांत दामले यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान
BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई
कोरोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या पडद्यामागील कलाकारांना मदतीचा हात देणारे अभिनेते प्रशांत दामले यांचा आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला.निर्माते, दिग्दर्शक सुभाष घई, नगरसेविका अलका केरकर यांसह समाजाच्या विविध क्षेत्रात कोरोना काळात असामान्य कार्य करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अनादी काळापासून आपल्या देशातील लोकांमध्ये समाजसेवेची आवड आहे. जनसेवा ही ईशसेवा मानली गेली आहे. समाजाला देणे ही संस्कृती लोकांच्या रक्तामध्ये भिनलेली आहे. त्यामुळे कोरोना काळात समाजासाठी काम करण्याची अहिमहीका बघायला मिळाली, असे यावेळी राज्यपालांनी सांगितले.
No comments