web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड वाल्हिवरे ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे;गावात ग्रामसेवक आठवडयातुन दोन वार दयावा ग्रामस्थांची मागणी..!

 

BY -  गौरव शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड ,ठाणे

मुरबाड तालुक्यातील वाल्हिवरे ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक नसल्याने येथील नागरिकांचे मोठया प्रमाणात हाल होत असल्याचे चित्र दिसत आहेत.वाल्हिवरे ग्रामपंचायत ग्रामस्थांना ग्रामपंचायत कार्यालयात कोणतीही सुविधा मिळत नसल्याने व हे कार्यालय नेहमीच बंद असल्याने रहिवासी दाखला ग्रामसेवक यांची सही जन्म मृत्यु दाखला विवाह नोंदणी दाखला अशा अनेक किरकोळ कामासाठी ग्रामसेवक यांचा सत्कार करण्यासाठी मोठया संख्याने नागरिकांना लांबुन येऊन तालुक्याच्या ठिकठिकाणी शोधावे लागत आहे.त्यामुळे नागरिकांना या ग्रामसेवक शोध मोहिमेचा मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.गरिब गरजु नागरिकांना गावातुन तालुक्याठिकाणी येण्यासाठी जास्त प्रमाणात पैसे मोजावे लागतात ते त्याना या कोरोनाच्या काळात तरी परवडण्यासारखे नाही. वाल्हिवरे ग्रामपंचायत ही संपुर्ण आदिवासी ग्रामपंचायत असून हे गाव तालुक्याच्या ठिकाणाहून खुप लांब आहे.तसेच वाल्हिवरे ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक यांचा निच्श्रित वार नाही वाल्हिवरे गावात ग्रामसेवक आठवडयातुन दोन ते तीन वेळा दयावे अशी मांगणी येथील नागरिकांनी केली आहे.

 

No comments