मराठी नंबरप्लेट लावली म्हणून आडविले हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य कि उध्दव ठाकरे सत्तेत आहेत - अविनाश जाधव (मनसे ठाणे,पालघर जिल्हाध्यक्ष)
BY - विशेष प्रतिनिधी, युवा महाराष्ट्र
लाइव – ठाणे |
आज ठाणे
जिल्हयाचे ढाण्या वाघ म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष
अविनाश दादा जाधव यांची ओळख आहे त्यांचा मराठी बाणा आणि त्यांचे कार्य आपणा सर्वांना
माहितीच आहे.अन्यायाविरूध्द लढा देणारे अविनाश जाधव हे मराठी
माणसांसाठी अहोरात्र झटत असतात.त्यांच्या समोर होणारा अन्याय ते कधीच सहन घेत नाही
आणि कोणावर हा अन्याय होत असेल तर ते सहन करून देत ही नाही याची जाणीव संपुर्ण महाराष्ट्राला
ज्ञातच आहे.मा.राजसाहेब ठाकरे यांचा आशिर्वाद त्यांच्या पाठिशी सदैव असून राजसाहेब
ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आज महाराष्ट्रात मराठी बाणा जागृत आहे याचे अनेक उदाहरण
आपल्याला गेल्या 15 ते 20 वर्षात डोळयासमोर आले आहे.त्यांच्या एका वाक्यात महाराष्ट्राचा
इतिहास सांगून जाणारा आणि अंगावर शहारा आणणारा आहे.त्यांच्या प्रेरणेतून आज ठाणे,पालघर
जिल्हयात जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे राजकारण विरहीत काम करित असून ग्रामीण भागातून
जिल्हा आणि आज जिल्हयातून थेट महाराष्ट्रात त्यांचे कार्य बेभान असल्याचे दिसून आले
आहे.असे बेभान,बेडक,निर्भिड कर्तव्यशिलतेचे प्रतिक म्हणून मनसेचे अविनाश जाधव यांचे
धडाडी पाऊल मराठी माणसांसाठी आणि महाराष्ट्रासाठी पुढे पडत आहे.अन्यायाला वाचा फोडण्याचा
काम ग्रामीण भागात व संपुर्ण ठाणे जिल्हयासह इतर जिल्हयात करित असताना काल ठाण्यात
असाच विषय उद्भवला असता हा विषय मराठी भाषेचाच होता.काल ठाण्यात पोलिस अनेकांच्या गाडया
बाजूला घेऊन गाडीवर मराठी नंबरप्लेट असल्याने कारवार्इ करण्याचे काम सुरू होते सदर
प्रकार मनसेचे ठाणे,पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचे निदर्शनास आले.ज्या गाडीवर
मराठी नंबरप्लेट दिसेल त्या वाहनांवर कारवार्इ करण्याचा बडगा काम चालू होते यावेेळी
मनसेचे अविनाश जाधव यांनी व्हिडीओद्वारे हा सर्व प्रकार तमाम महाराष्ट्रासमोर आणला
आहे.सदरचा प्रकार पुर्णतः जाणून घेण्यासाठी पत्रकार कुणाल शेलार यांनी थेट अविनाश जाधव
यांचेशी संपर्क साधून घेतला आहे.मनसेचे अविनाश जाधव यांनी स़ोत असणारे उध्दवजी ठाकरे
यांना सदरचा प्रकार व्हिडीओद्वारे दाखविला असून हे पाहणे म्हणजे महाराष्ट्राचे दुदैव
आहे.स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राचे सरकार या महाराष्ट्रात आहे ज्यांना मराठीचा
आधार मानला जातंय,आणि ते वचनपुर्ती आहे त्याच महाराष्ट्रात मराठी भाषेचे नंबरप्लेट
लावल्यानंतर ठाण्यामध्ये कारवार्इ करण्यात येत आहे हे महाराष्ट्रात तरी व्हायला नको
असेही त्यांनी सांगितले.
अनेक राज्यात मी गेलो तेथे त्यांची भाषा
जोपासतात मग आपण महाराष्ट्राचे भुमिपुत्र आहोत तर आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान नको
का? महाराष्ट्राची भाषा जोपासणारे अनेक मराठी बांधव आहेत परंतू असे असतानाही काल ठाण्यात
पोलिसांनी त्याच महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या गाडीवरील मराठी प्लेट लावणार्यांवर
कारवार्इ सत्र सुरू केले आहे.माझ्यासह अनेकांना अडवून गाडीला मराठी नंबर प्लेट लावणार्या
मराठी माणसांवर कारवार्इ करण्याचे सत्र सुरू केले असता हे पाहता आमचे दुर्भाग्य की
या महाराष्ट्रात सत्तेत असणारे उध्दवजी ठाकरे हे महाराष्ट्राचेच आहे.
No comments