web-ads-yml-728x90

Breaking News

शेकडो लोकांची सेवा करणारे डॉ.स्वप्निल वाकचौरे...

 

BY - कुणाल शेलार, युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |

मुरबाड ग्रामीण रूग्णालयात दिवस-अहोरात्र गोरगरिबांची काळजीवाहू सेवा करणारे डॉ.स्वप्निल वाकचौरे यांच्या डात्क्टरकीच्या माध्यमातून जनसामान्यांची सेवा करतांना दिसत असल्याने तालुक्यात त्यांच्या कार्याची प्रशंसा होत आहे.

          डॉ.स्वप्निल वाकचौरे यांचा अनुभव रूग्णांना पाहताच उपचार सांगून जाणारा ठरत आहे.दिवस असो वा रात्र एकनिष्ठेने व कर्तव्यपरायणाची भूमिका साकारतांना डॉ.स्वप्निल वाकचौरे यांनी आपली जबाबदारी ही पार पाडली असून आजही आपली समाजसेवी भूमिका पार पाडतांना दिसत आहे.प्रत्येक रूग्णाला आपल्या कुटूंबाचे सदस्य मानून रूग्ण नव्हे तर नातेवार्इक म्हणून उपचार करतांना दिसले आहेत.तात्कालीन उपचार असो की,औषधांची गरज सर्व गरजा या ग्रामीण रूग्णालयातूनच पुर्णत्वाने केले जाते.ग्रामीण रूग्णालयात येणारा व्यक्ती हा आपल्याच शासकीय रूग्णालयातून बरा होऊन घरी सुखरूपाने गेला पाहिजे अशी मनोधारणा डॉ.स्वप्निल वाकचौरे यांची आहे. 24 तास तत्पर असणारे डॉ.स्वप्निल वाकचौरे यांची ग्रामीण भागात एक जनसेवक म्हणून ओळख निर्माण झाली आहे.त्यांनी जेव्हा पासून ग्रामीण रूग्णालयाचा पदभार सांभाळला तेव्हापासून ते आजतागायत रूग्णांना कौटूंबिक सदस्य म्हणून आधार मिळाला आहे.          कोरोना प्रादुर्भावात त्यांनी आपली जबाबदारी चोख पध्दतीने पार पाडली असून एक पाऊलही मागे नेले नाही.कोरोनावर मात करतांना त्यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला.ग्रामीण रूग्णालयात येणार्‍या रूग्णाला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन करत असल्याने नागरिकांची ओढ ही खाजगी रूग्णालयातून शासकीय रूग्णालयाला लागली आहे.शासनावर विश्‍वास ठेऊन शासकीय रूग्णालयातच नागरिकांना सेवा मिळावी व बरे होणेकरिता आजही डॉ.स्वप्निल वाकचौरे हे मोठया धडाडीने आणि निर्भिडतेने लोककल्याण सेवा एक कोरोना योध्दा म्हणून करित आहेत त्यामुळे काहीं केलेली विविध अफवा व वाभाडे काढणार्‍या व्यक्तीने निदान अशा व्यक्तीवर ताशोरे मारू नये ज्याने मुरबाडच्या ग्रामीण रूग्णालयाचा भार ऐन संकटात असताना सांभाळला आहे.एक तर ग्रामीण रूग्णालयात डॉक्टर पाहिजे अशी ओरड असते जेव्हा अनुभवी डॉक्टर पदभार स्विकारतो आणि सेवा करतो तेव्हा त्याला दंबंगशाहीने दमदाटीने काही जण त्यांची किंमत शुन्य करतात असे करण्याअगोदर त्यांनी विचार करावा जो सेवा करतो त्याला सेवा करू द्दया यात तर सिध्द होणार नाही काही परंतू एक डॉक्टर जार्इल त्रास तर येथे येणार्‍या रूग्णालाच होर्इल कारण मुरबाडला कोणी यायलाच नसतो आणि जो येतो त्याला कोणत्या ना कोणत्या कारणाने दबावशाही वापरून त्याला त्रास दिले जाते.परंतू कितीही त्रास दिले तरी डॉ.स्वप्निल वाकचौरे यांनी रूग्णांची साथ सोडली नाही.कितीही संकटे आली तरी त्यावर मात करण्याची धमक डॉ.स्वप्निल वाकचौरे यांचेत आहे कारण त्यांच्या सेवेमागे मुरबाडकरांची सावली आहे हे निश्‍चितच.

No comments