web-ads-yml-728x90

Breaking News

नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, पालिका आयुक्तांचे आदेश

 

BY -  युवा महाराष्ट्र लाइव – नागपूर |

राज्यातील ९ ते १२पर्यंतच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. मात्र, अनेक जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्थानिक प्रशासनाकडून शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे पाठोपाठ आता नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील शाळाही १३ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. या संदर्भातील अध्यादेश आजच महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जारी केले आहे. शहरातील वाढत्या रूग्णसंख्येच्या अनुषगांने खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे अध्यादेशात सांगण्यात आले आहे.

No comments