web-ads-yml-728x90

Breaking News

मालगुंडच्या समुद्रात तीन तरुण बुडाले; एकाचा मृत्यू

 

BY -  युवा महाराष्ट्र लाइव – रत्नागिरी |

ठाणे येथील तीन तरुण पर्यटनासाठी मालगुंड समुद्रकिनारी आले असता, पाण्याचा अंदाज न आल्याने ते तिघे समुद्रात बुडाले. त्यातील दोघांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले असून, एकाचा या घटनेत मृत्यू झाला आहे. तुषार शरद दळवी असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून शेखर राजेशिर्के, निमेश त्रिपाठी असे उर्वरित दोघांची नावे आहे. हे तिघे शुक्रवारी सायंकाळी पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आले होते. शुक्रवारी मुक्काम करून ते सर्वजण शनिवारी पर्यटनासाठी बाहेर पडले. दुपारी ३ च्या सुमारास ते मालगुंड गायवाडी समुद्र किनारी आले. त्याठिकाणी सेल्फी काढून ते थेट आंघोळीसाठी समुद्रात उतरले.

 

No comments