web-ads-yml-728x90

Breaking News

...राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी लायक, पण आमची तशी मागणी नाही - देवेंद्र फडणवीस

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

ठाकरे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरलं आहे. हे दमनकारी सरकार आहे, असं सांगतानाच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यास हे सरकार लायक आहे. पण आम्ही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केलं.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्ट केलं. पत्रकार अर्णव गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्या प्रकरणात कोर्टाने दिलेल्या निकालावरून राज्यात सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवाय राज्यात सत्ता यंत्रणेचा दुरुपयोग होत असल्याचंही कोर्टाने मारलेल्या ताशेऱ्यांवरून स्पष्ट होत आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी हे निर्णय पुरेसे असले तरी आम्ही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं.

No comments