web-ads-yml-728x90

Breaking News

अमरावतीत कोरोना चाचणीसाठी शिक्षकांच्या रांगा; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

 

BY -  युवा महाराष्ट्र लाइव – अमरावती |

कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेल्या राज्यातील शाळा येत्या २३ नोव्हेंबरला सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. त्यानंतर आता वर्ग ९ वी ते ११वी पर्यंतच्या शाळा सुरू होणार असल्याने शिक्षकांना कोरोना चाचणी करून घेणे अनिवार्य आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीमधील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या शिक्षकांच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या. तसेच, शिक्षिकांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवल्याचे दिसून आहे.

 

No comments