web-ads-yml-728x90

Breaking News

नाय दादागिरी चालणार कोनाची ! यी त मुंबय हाय आगऱ्यान कोल्यांची* या गाण्याचा प्रसारण सोहळा संपन्न

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

नाय दादागिरी चालणार कोनाची ! यी त मुंबय हाय आग्र्या कोल्यांची या गाण्याचा प्रसारण सोहळा मोठ्या थाटामाटात नुकताच संपन्न झाला. हे गाणे बनविण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासुन गीतकार श्री. अशोक गुळवी, श्री. संतोष घरत, संगीतकार श्री.अनिल वैती, ध्वनिमुद्रक श्री किरण जोशी,यांनी खुप अविरत प्रयत्न करुन यशस्विरित्या संपन्न केले. या गाण्यात तब्बल १३१ आगरी कोळी समाजातील गायक कलावंतांनी सहभाग घेवून गाणे तयार करण्यात आले आहे. आगरी कोळी समाजात एकोपा नांदावा,समाजातील रुढि, परंपरा, संस्कृती, वेशभूषा, यांचे जागतिक स्तरावर दर्शन घडावे. या उद्देशाने या गाण्याला यश आले असून अधिकृतरित्या मा.आमदार व कोळी समाजाचे नेते श्री अनंत तरे साहेब व आगरी समाज नेते श्री. जयेन्द्रदादा खुणे यांच्या शुभहस्ते हा प्रसारण सोहळा संपन्न झाला .प्रमुख पाहुण्यांचा श्री.अनिल वैती व श्री.अशोक गुळवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आगरी समाज नेते श्री.जयेन्द्र दादा खुणे यांनी आपल्या भाषणात म्हटले कि सामाजिक प्रबोधनातून या गाण्याची निर्मिती करण्यात आली असून जगातील कुठल्याच गाण्यात एवढ्या मोठ्या संख्येने गायकांना घेवून कोणीच गाणे तयार केलेले नाही तेव्हा हे गाणे जागतिक स्तरावर वाटचाल करीत असुन  १३१ गायकांना शुभेच्छा व अभिनंदन करुन हया गाण्याची लिम्का बुक आणि गिनीज बुक मध्ये नोंद होईल तसेच समाजातील रूढि, परंपरा, वेशभूषा, संस्कृति, बोलीभाषा जतन करावे व आपल्या गावातील समस्याचे निवारण करण्यासाठी सर्वानी एकत्र येवून निवारण करण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. श्री अनंत तरे साहेब ( कोळी समाज नेते ) यांनी आपल्या भाषणात सांगितले कि  आगरी कोळी समाजात आपली मालकी हक्क सिध्द करण्याच्या हेतुने आपल्याला ताकद दाखवावी लागेल. कोर्टात जाताना आपण वकील किंवा जज म्हणून जावे, हॉस्पिटलमध्ये जाताना आपण डॉक्टर किंवा डीन म्हणून जावे तसेच एका घरात चार भाऊ असतील तर त्या एकाच घरात चार चूली निर्माण होतात.चार कुटुंब वेगवेगळे खातात हे चित्र बदलावे लागेल दोन्ही समाजाने एकत्र काम करायला पाहिजे यावर चर्चा विनिमय करुन पावले उचलावी म्हणून प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या कार्यक्रमाप्रसंगी मा.नगरसेवक श्री.संजय तरे, गायक-संगीतकार श्री अनिल वैती, गीतकार श्री. अशोक गुळवी, कु.यश अनिल वैती, कु.संस्कृती खुणे, कु ओम वैती इत्यादि मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.

 

No comments