web-ads-yml-728x90

Breaking News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विनम्र आदरांजली

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनम्र आदरांजली अर्पण केली आहे.दिवंगत बाळासाहेबांनी त्यांच्या नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य केले. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी  माणसाचा सन्मान व  सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जीवनभर संघर्ष केले. महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती  आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. स्वर्गीय बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशातून केले आहे.

 

No comments