web-ads-yml-728x90

Breaking News

अन्न पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी कडक कारवाई करा – राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाईसह विविध अन्नपदार्थातील भेसळ रोखण्याचे आणि खाद्य तेलाच्या डब्यांचा पुनर्वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई चे निर्देश अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले.मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. भेसळ विरोधातील मोहीम अधिक तीव्र करताना भेसळखोरांवर कडक कारवाई करण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना श्री. पाटील यांनी दिल्या.दिवाळी पार्श्वभूमीवर खवा (मावा), पनीर, खाद्यतेल, मिठाईसह विविध अन्न पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी उपाययोजना, भेसळ ओळखण्यासाठी जनजागृती तसेच भेसळ करणारी दुकाने, कंपन्या, आस्थापना, दुकानदारांवर छापे टाकून कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्यमंत्री यड्रावकर यांनी दिले, प्रसंगी त्यांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

No comments