web-ads-yml-728x90

Breaking News

रिक्षाचालकाचा शोध लागला अन् महिलेचा जीव भांड्यात पडला...

 

BY -  युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |

एका रिक्षात प्रवास करीत असतानाच त्या महिलेचे ५ तोळ्याचे मंगळसूत्रासह रोख २० हजार रुपये आणि मोबाईल, असा मुद्देमाल एका पिशवीत होता. मात्र ती पिशवी रिक्षात विसरल्याने त्यांना धक्काच बसला होता. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर तपासादरम्यान एका सीसीटीव्हीत फुटेजमध्ये त्या रिक्षाचा नंबर दिसून आला. त्यानंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी २४ तासातच त्या रिक्षाचालका शोधून त्याच्याकडून दागिने, रोख व मोबाईल असा २ लाख ८० हजार रुपयांच्या मैल्यवान वस्तू हस्तगत करून त्या महिलेच्या स्वाधीन केले.सुशीला नंदकिशोर वाघमारे (वय,५१) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. पोलिसांमुळे रिक्षात राहिलेले दागिने आणि पैसे परत मिळाल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला आणि आनंद व्यक्त केला

No comments