0

 

BY -  युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |

ठाण्यातील बी कॅबिन परिसरातील, दादा पाटील वाडी हा भाग आता स्नॅक्स व थाळीसाठी खवय्यांची पहिली पसंती बनू लागला आहे तो तिथे असणाऱ्या अनेक फूड जॉइंट्स मुळे. याच भागात राजदर्शन सोसायटीत मंगलम क्लॉउड किचन या नवीन संकल्पने अंतर्गत सुरू होणाऱ्या ठाण्यातील पहिल्या टेक अवे एक वेगळं कन्सेप्ट रेस्टॉरंट सुरु झालं आहे. रेस्टॉरंटचे औपचारिक उद्घाटन दै सामनाचे सीईवो विवेक कदम, डायरेक्टर संजय वाडेकर, शिवसेना विभागप्रमुख गिरीश राजे, आणि मंगलम क्लॉउड किचनचे डायरेक्टर देवांग गाडीया, फ्रांच्याइसचे अजय नाईक आणि त्यांच्या सुविद्य पत्नी योगिता नाईक या मान्यवरांच्या शुभहस्ते दि २० नोव्हेंबर २०२० रोजी थाटामाटात उदघाटन संपन्न झाले.

मंगलम क्लॉउड किचनची खासियत म्हणजे इथे आपल्या आवडीनुसार ऑफिसला जाणारे , व ऑफिसमधून येणारे किंवा ठाण्यात कामासाठी येणारे खवैये विविध प्रकारच्या प्री पॅक स्नॅक्स व थाळीचा स्वाद, आपल्या घरी, कार्यालयात किंवा प्रवासातही घेऊ शकतात, यात वडापाव, पोहे, मिसळ, उपमा, समोसे, तसेच साबुदाणा खिचडी इत्यादि अनेक प्रकारच्या प्री पॅक स्नॅक्स सह, विविध प्रकारच्या प्री पॅक थाळ्यांचा समावेश आहे, यात मिनी थाळी (राईस, डाळ, भाजी), डीलक्स थाळी (चपाती/पुरी, राईस, डाळ, भाजी, रायता), एक्सिक्युटिव्ह थाळी चपाती/पुरी, राईस, डाळ, दोन भाज्या, रायता, लोणचं), प्रीमियर थाळी (चपाती/पुरी, राईस, डाळ, दोन भाज्या, रायता, लोणचं, स्वीटस आणि फरसाण)यातून ग्राहक आपल्या आवडीनुसार थाळी सिलेक्ट करू शकतात. प्रत्येकाच्या वेगवेळया चवीची, खिशाला कोणतीही जास्तीची चाट न बसता. सुंदर अँबियन्स , चविष्ट जेवण, नो वेस्टेज , भरपूर चॉईस आणि हॉस्पिट्यालिटीचा उत्तम अनुभव म्हणजे मंगलम क्लॉउड किचन ठाण्याचे रहिवासी आणि फ्रांच्याइसचे अजय नाईक आणि त्यांच्या सुविद्य पत्नी योगिता नाईक यांची हि ठाणेकरांकरिता चविष्ट मंगलम भेट आणली आहे.

Post a Comment

 
Top