0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना घराबाहेर पडण्याची मनाई करण्यात आली होती. तर, रस्त्यावर विनाकारण वाहन चालविणाऱ्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली होती. आता शहरात सर्वत्र अनलॉक करण्यात आल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे. मात्र, मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल ही अजूनही सामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आली नाही. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर याचा सर्वाधिक ताण पडत आहे. याचा फायदा परवानाधारक नसलेले खासगी वाहनचालक घेत आहेत. यामुळे परवाना असलेल्या टॅक्सी व रिक्षाचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Post a Comment

 
Top