web-ads-yml-728x90

Breaking News

कृषी उत्पन्न बाजार समिती वाल्यांनी गाल्यांची केली बेकायदेशीर विक्री ; सत्तेत असल्याने काय घंटा कारवार्इ होणार ; केंद्र शासनाकडे फेरचौकशीची मागणी

 

BY -  कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे |

विकले गेले ते ज्यांनी कालपर्यंत विरोधीपक्षात राहून राजनिती केली आणि आज घंटा काय कारवार्इ होर्इल तेच विरोधी नेते पक्षात सत्तेच्या खुर्चिवर बसलेत अशामुळे सत्तेतील भ्रष्टाचारी नेत्याने शासनाच्या जागा लाटून गाले बांधून त्या गाल्यात आपल्याच घरातील कुटूंबांना शेतकरी म्हणून दाखविले आणि गाल्यांचे वाटप केले.मुरबाड तालुक्यातील शेतकरी वर्गाच्या नावावर बनविलेल्या गाळयांवर सत्ताधिकारी यांनी सत्तेचा फायदा घेत अधिकारी वर्गांना आदेश देत कोणत्याही  तक्रारीला दुजोरा देऊ नये म्हणून सांगितल्याने मुरबाड तहसिलदारांनीही दुर्लक्ष दाखविले आहे.स्वतःची पोळी भाजतांना शेतकर्‍यांच्या जिवावर स्वतः गाले घेतले.अनधिकृत इमारत असूनही कारवार्इ नाही,एफ.एस.आय.वाढविले असून कोटयावधीचा भ्रष्टाचार केले असून या मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीने केला असून चेअरमन,सचिव,संचालक मंडळ आणि ठेकेदाराने भागिदारी केली आहे.पणन महामंडळाची परवानगी नसतांना 72 गाळयांची बेकायदेशीर बांधकामे करून आपसात वाटाघाटी करून शासनाच्या जागेला हडप केले आहे.खोटे कागदपत्र आणि दस्त बनवून सदरचे 72 गाळे बांधून बेकायदा व्यवसायिकांना गाळयांची विक्री केली आहे.जागेचा सर्व्हे हा शासकीय दफ्तरी धूळखात पडून असून तहसिलदारांच्या आदेशाला मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमन,सचिव,संचालक मंडळ आणि ठेकेदाराने केराची टोपली दाखविली आहे.याच मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीला मुरबाड एम.ए.सी.बी ने अनधिकृतपणे गाळयांना लार्इट दिली तर मुरबाड नगरपंचायतीने अनधिकृत असल्याने दंड मारले परंतू सत्तेमध्ये सामील झालेले नेते यांनी सत्तेच्या पदाचा गैरवापर करून अधिकरी वर्गाला मॅनेज केले आहे त्यामुळे कोणतीही कार्यवाही अन्य चौकशी ही पुर्णतः केली गेली नाही.मुख्यमंत्री ते जिल्हाधिकारी आणि तहसिलदार ते मुरबाड नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 72 गाळयांवर आपली मेहरबाणी दाखवित कार्यवाहीला निरंकाचे चिन्ह बहाल केले आहे.मागील काही 7 ते 8 महिण्यांपुर्वी केंद्र शासन यांचेकडे ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी 72 गाळयांना सील करून शासनाची जागा लाटणार्‍या आणि कोटयावधीचा भ्रष्टाचार करून अनधिकृत इमरत उभी केल्याच्या तक्रारीवरून महाराष्ट्र राज्यांच्या सचिवांना चौकशी करून तात्काळ कारवार्इचे आदेश दिले असतांना सत्ताधिकारी नेत्याचे गाळे असल्याने त्या चौकशीचीला धूळीत टाकले होते परंतू याच चौकशीला फेर चौकशीची मागणी आज करण्यात आली आहे.अशा मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळयांत कोटयावधीचा घोटाळा झाला असून याची सर्व गाळयांची फेर चौकशी करावी आणि सर्व गाळयांबरोबर शासनाची असणारी जागा पुन्हा शासनाने ताब्यात घ्यावी अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी केंद्र शासनाकडे केली आहे.

 

 

 

No comments