मुरबाड मधील एसबीआय बँकेच्या चांगल्या कामाचे नागरिकांकडून कौतुक
BY - गौरव शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड ,ठाणे
मुरबाड तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) SBI BANK MURBAD बँकेमध्ये कोरोनाच्या पाश्वूभूमीवर लोकांची कामे कोलमजली होती.ती कामे मुरबाड स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) बँक मार्गी लावत आहे.तालुक्यातील एक शाखा असुन या बँकेमध्ये खुप गर्दी होते याचा त्रास मात्र वृध्दांना होत असे त्यांच्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने एक कल्पना लावुन गेट लगत स्टॉल लावुन पेन्शन धारक वयोवृध्दांची कामे झटकापट मार्गी लावत असल्याचे चित्र दिसत आहे.या बँकेचे मॅनेजर राधी मॅडम त्यांचे सहकारी रामदास बांंबले, संदिप बाबरे, सिक्युरिटी पाटील व कर्मचारी वर्ग यांनी विशेष मेहनत घेऊन मास्क,सॅनिटायझर सुविधा पुरक करून कोरोना महामारीवर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत.गोर गरीब सामान्य नागरिकांना या बँकेत सुध्दा चांगल्या प्रकारे सहकार्य केले जात असल्याचे नागरिक बोलत आहेत.
No comments