BY - विशेष प्रतिनिधी, युवा महाराष्ट्र
लाइव – ठाणे |
मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागात नेमून दिलेल्या तलाठी कार्यालयात
तलाठी हजर नसतात,तलाठींची कामे खाजगी हाताखाली ठेवणार्यां मुलांनी हाती घेतले असून
अनेक सातबारा,फेरफार जनू तलाठी नव्हे तर तो खाजगी व्यक्तीच घडू लागल्याचे चित्र उमटले
होते.सदरहू प्रकार घटनास्थळी पत्रकार कुणाल शेलार यांनी जाऊन पाहिले असता जेथे जेथे
तलाठी यांचे कार्यालय आहेत तेथे पदभार न स्विकारता थेट मुरबाड तहसिल कार्यालयात थान
मांडतांना दिसून आल्याने मुरबाड तहसिलदार कार्यालयासमोर केवळ जमिनी खरेदीचे मालक आणि
दलाल यांची मोठया प्रमाणात गर्दी पाहण्यास मिळाली आहे.तलाठी यांना स्वतंत्र
कार्यालय असताना मुरबाड शहारातील तलाठी कार्यालयात नेमून दिलेले तलाठी यांची हजेरी
लागली गेली आहे.प्रत्येकांना वार ठरवून दिले असतांना मुरबाड तहसिलदार कार्यालयात तसेच
मुरबाड शहरातील तलाठी कार्यालयात दुसर्या विभागातील तलाठी यांनी आपली खुर्ची राखीव
ठेवली आहे.अनेक तलाठी यांच्याशी संपर्क साधले असता घटनास्थळी तलाठी नसून खाजगी मुलं
आढळून आली आहेत.त्यामुळे मुरबाड तालुक्यातील त्या त्या विभागात पदभार नेमून दिलेल्या
तलाठयांनी गावात राहून आपले काम पाहावे जेणे करून गावातील शेतकरी,शालेय विद्दयार्थी,ज्येष्ठ
नागरिक यांचे पायपीठ होऊ नये या गंभीर विषयाची दखल पत्रकार कुणाल शेलार,मन्साराम वर्मा
यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन थेट ठाणे जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून मागणी पत्र
देऊन चाललेला अनागोंदी प्रकारावर मुरबाड तहसिलदारांचे वचक नसल्याने आपण लक्ष घालून
संबंधित तहसिलदारांना निर्देश द्दयावे अशी विनंती केली असता तात्काळ ठाणे जिल्हाधिकारी
यांनी संबंधित विषयाची दखल घेत आपल्या धडाडी कार्याचे पाऊल टाकत ठाणे जिल्हाधिकारी
कार्यालयातच सर्व तहसिलदार व डेप्युटी अधिकारी यांना तलाठी यांना त्या त्या विभागात
नेमून दिलेल्या जागेवर जाऊन काम करण्याचे आदेश दिले.
तलाठी यांच्याशी संपर्क साधला तेव्हा मंडळ
अधिकारी जवळ असल्याचे सांगून स्वतःची पायपीठ होऊ नये म्हणून कारणे सांगितली गेली परंतू
खरच का मंडळ अधिकारी यांना तलाठी सर्वच त्यांच्या कार्यालयात हवे का ? असाही प्रश्न
उपस्थित होतो.अनेक तलाठयांना आपला पदभार जेथे आहे तेथे दिले असूनही मुरबाड शहरातील
तलाठी कार्यालयात तसेच मुरबाड तहसिलदार कार्यालयात तलाठी असतात.20 ते 25 किमी अंतरावरून
आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना,शालेय विद्दयार्थी,शेतकर्यांना तलाठयांचा गवस करावा लागतो
कारण तलाठी कधी इथं तर कधी तिथं त्यामुळे तलाठी नेमकी कोणाच्या कामासाठी आहे जमिनीची
विक्री खरेदीच्या व्यवहारात सातबारा किंवा फेरफार घडविण्यासाठी कि नागरिकांच्या समस्यांचे
निराकरणासाठी यामुळे सर्व विषय ठाणे जिल्हाधिकारी यांना कळताच जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर
यांनी सर्व तहसिलदारांना जेथे आहेत तेथे तलाठी यांनी आपला पदभार स्विकारावा असे आदेश
दिले.एखादया कागदपत्राची पुर्ततः न झाल्याने पायपीठ करणारा नागरिक काम न झाल्याने निराशेने
माघोवा जातो कामे तात्काळ होत नाहीत,मोठया कामांना पंचनामा होत नाही,तहसिलदार,नायब
निवासी तहसिलदार यांचेकडून कोनतेही आदेश होत नाही डोळयासमोर घडत असलेल्या अनागोंदी
कामांना पाठिंबा देतात,त्यामुळे हा गंभीर विषय मानला जात असून याचा त्रास मात्र नागरिकांना
होत आहे त्यामुळे तलाठी यांनीच त्या त्या विभागात जाऊन आपले काम पहावे कोणतेही बहाणा
अथवा कारणे सांगू नये,ठाणे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे काटेकोरपपणे पालन करावे
अशी विनवनी ही करण्यात आली असुन तहसिलदार त्यांच्या आदेशांचे पालन केव्हा आणि कधी करणार
याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
तलाठी हजर नसल्याने फेरफार,सातबारा घडविला
जात असून अनेक ठिकाणी पाहिले असता एखाद्दया केसेस चा निकाल येण्यापुर्वीच निर्णय देण्यात
येते.नंतर शेतकर्याला त्या जमिनीच्या मालकाला कळाल्यास फेरफारला चॅलेंज देण्यास अधिकारी
सांगतात त्यामुळे दाव्यावर दाव्याची साखळी हि तयार होते ही साखळी तयार न हो त्यासाठी
दिलेल्या नियमात काम करण्यासाठी तलाठी यांनी आपल्या दिलेल्या पदभारावर जाऊन त्या त्या
विभागात काम करण्याची मागणी कुणाल शेलार,मन्साराम वर्मा यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांचकडे
केली आहे.त्या मागणी तात्काळ नायक भुमिकेची दखल ठाणे जिल्हाधिकारी राजेशजी नार्वेकर
यांनी संबंधित सर्व तहसिलदारांना पुन्हा फेर आदेश दिल्याने त्यांच्या धडाडी,निर्भिड,कुशलतेचे
व प्रशासक भुमिकेचे कार्याला पाहून सर्व स्तरातून नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.
Post a comment