web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड मध्ये मुलीची लाटया काटया आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबीराचे ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांच्या हस्ते उदघाटण

BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

महाराष्ट्र युवा संघ कल्याण सलग्न नेहरू युवा केंन्द्र ठाणे युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकार सयोजक मुरबाड तालुका युवा व क्रिडा मंडळ सहयोग ड्रॅगन इंडियन कराटे वेलफेअर असोशियन मुरबाडच्या वतीने मुलीना संरक्षण करता यावे यासाठी मुरबाड कराटे क्लासेसचे शिक्षक वसंतशेठ जमदरे अजित कारभारी यांनी तीन दिवसीय मुलीचे लाटी काटी प्रशिक्षण भरवले आहे.या शिबीराचे उदघाटण स्वप्नज्योती टार्इम्सचे कार्यकारी संपादक ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी प्रमूख अतिथी म्हणुन लक्ष्मण घागस सर व्यासपिठावर उपस्थित होते.27 ते 29 नोव्हेंबर तीन दिवस प्रशिक्षण चालणार आहे. 

मुरबाड तालुक्यात 1 लाख 40 हजार मतदार असून पाच लाखाच्यावर लोकसंख्या असलेल्या तालुक्यातील मुली महिलाचं संरक्षण या मुलीच्या माध्यमातुन होऊ शकेल आपली जबाबदारी म्हणुन मुली स्वसंरक्षण कुटूंबाचं संरक्षण तालुक्यातील महिलाचे संरक्षण करू शकतील आपला ग्रामीण भागात मागे नाही याच लाटीकाटी कराटे प्रशिक्षणातुन उदयाचे देशाचे राज्याचे जिल्हयाचे महिला खेळाडू घडू शकतील असे उदघाटक नामदेव शेलार यांनी सांगुन कराटे प्रशिक्षक वसंतशेठ जमदरे कारभारी यांनी असंख्य घडवलेल्या युवक युवती कराटे पट्टुंचे स्वागत केले.आज शारिरक बुध्दीमता काळाची गरज आहे.

 

खेळाबरोबर अभ्यासातही नाविन्यपुर्ण कामगिरी करा महिला वरिल अत्याचाराला आळा घालण्यासाठी परिणामी जशाचतसे उत्तर देण्यासाठी तुमची काटी लाटी कराटे कामी येर्इल असेही ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी सांगुन आपल्या कार्यकौशल्याला आमची साथ असेल अशा शुभेच्छा दिल्या यावेळी लक्ष्मण घागस सर यांनी मौलाचे मार्गदर्शन केले 

 


तर कराटे प्रशिक्षक वसंतशेठ जमदरे अजित कारभारी यांनी आभार मानले शिबीर 27 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर पर्यंत काँगे्रसभुवन येथे पार पडत असुन कराटे शिक्षक ज्योती खरे,हर्षदा जाधव, मधुकर गायकर याचे योगदान सहकार्य लाभले सर्व कराटे प्रशिक्षिक युवकानी शिबीराला हजेरी लावली.

No comments