web-ads-yml-728x90

Breaking News

रायगड जिल्ह्यात शासकीय विधी महाविद्यालय स्थापन होणार

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

माणगांव तालुक्यातील मौ.जावळी येथे असलेल्या शासकीय जागेवर नियोजित शासकीय विधी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी विभागाने त्वरित प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.कोकण विभागासाठी मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगांव परिसरात शासकीय विधी महाविद्यालय सुरु व्हावे, अशी विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, शिक्षणतज्ञ, विद्यार्थी व पालक यांची मागणी होती. त्यास अनुसरुन विधी व न्याय राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याने आयोजित बैठकीत ते बोलत होते.यावेळी विधी व न्याय राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांच्यासह रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, उच्च व तंत्र शिक्षण संचालक श्री.माने, सह संचालक संजय जगताप आदी अधिकारी उपस्थित होते.

No comments