web-ads-yml-728x90

Breaking News

कल्याणच्या गोदरेज हिल परिसरातील इमारतीमध्ये घराला आग

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - कल्याण

कल्याणातील उच्चभ्रू वस्ती अशी ओळख असणाऱ्या गोदरेज हिल परिसरात असणाऱ्या सोसायटीमध्ये घराला मोठी आग लागली. यामध्ये संपूर्ण फ्लॅटचे नुकसान झाले असले तरी अग्निशमन दल वेळेवर पोचल्याने मोठी दुर्घटना टळली. कल्याण पश्चिमेतील गोदरेज हिल परिसरातील टेकडीवर एकोरिना -कॅसोरीना नावाची मोठी सोसायटी आहे. यातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील प्रशस्त घराला ही आग लागली. बेडरूममध्ये असणाऱ्या एसीमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे अवघ्या काही मिनिटांत ती संपूर्ण घरात पसरल्याची प्राथमिक माहिती आहे.  आग लागली तेव्हा घरामध्ये काही सदस्यही उपस्थित होते. आगीने अवघ्या काही वेळातच रौद्ररूप धारण करीत संपूर्ण घराला विळखा घातला. ही आग एवढी मोठी होती की घराच्या गॅलरीतून वरच्या गॅलरीपर्यंत पसरू लागली. मात्र अग्निशमन दल वेळेवर पोहोचल्याने ही आग इमारतीमध्ये पसरू शकली नाही.

 

No comments