web-ads-yml-728x90

Breaking News

सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील रुग्णालयाची इमारत नव्याने बांधण्याचा प्रस्ताव पाठवा

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित असणाऱ्या सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील रुग्णालयाची सध्याची इमारत जीर्ण झाली असून मोडकळीस आली आहे. या इमारतीच्या जागी 500 खाटांची सुविधा असणारी नवी इमारत बांधण्याचा प्रस्ताव तातडीने पाठवावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले.मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुविधांमध्ये वाढ करण्याबाबत मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने, सांगली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता माने, कार्यकारी अभियंता रोकडे व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments