0

 

BY -  युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |

कोविडमुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणीबाणी संकटाचा गैरवापर करून केंद्र सरकारने अस्तित्वात असलेले सर्व कामगार कायदे रद्द केले. केंद्र सरकारने कामगार संघटना, राजकीय पक्ष, तसेच लेाकसभा-राज्यसभेमध्ये चर्चा देखील न करता नवीन चार कामगार विरोधी संहिता (लेबर कोड) पारित केले. त्याचबरोबर ज्यांच्यामुळे छोटे शेतकरी बड्या काॅर्पोरेट कंपन्यांच्या मगरमिठीत पकडले जातील आणि अन्नधान्याच्या काळाबाजाराला कायदेशीर मान्यता मिळेल, असे तीन कायदे देखील या सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केले. मात्र हे मंजूर केलेले कायदे रद्द करण्यासाठी देशात आतापर्यत विविध मागण्यांसाठी 19 देशव्यापी आंदोलने झाली आहेत. त्यापेक्षा मोठे आंदोलन 26 आणि 27 नोव्हेंबरला होणार असल्याचे डॉ. अशोक ढवळे यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top