0

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतंर्गत सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना एलआयसी योजनेंतर्गत निवृत्तीनंतर देण्यात येणारे एकरकमी लाभ दिवाळीच्या आत देण्यात येणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी सांगितले.मंत्रालयात अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित बैठकीत ॲड.ठाकूर बोलत होत्या. यावेळी महिला व बाल विकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त श्रीमती इंद्रा मालो, एलआयसी चे अधिकारी उपस्थित होते.

Post a comment

 
Top