web-ads-yml-728x90

Breaking News

दिवाळीनंतर चारच दिवसात डाळींच्या किंमतीत घसरण; खाद्यतेलाचे भाव वाढण्यास सुरुवात

 

BY -  युवा महाराष्ट्र लाइव – नाशिक |

दिवाळीनंतर चार दिवसात डाळी किमती कमी झाल्या आहेत. दिवाळीनंतर म्यानयारमधून मोठ्या प्रमाणात भारतात तूरडाळ आयात झाल्याने तूर डाळीच्या किंमती कमी झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, दुसरीकडे खाद्यतेलाचे भाव वाढल्याचे चित्र आहे.दिवाळीत डाळींचे दर 100 रुपये किलोहून अधिक झाले होते. दिवाळी संपल्यानंतर काही प्रमाणात दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसात तूर डाळी अजून स्वस्त होतील अशी चिन्हे आहेत. मात्र दुसरीकडे मात्र खाद्य तेलाचे दर भडकले आहेत.

No comments