web-ads-yml-728x90

Breaking News

नुकसान भरपाईपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही-महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

 

BY -   युवा महाराष्ट्र लाइव – रत्नागिरी

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याबाबत प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असे निर्देश महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. पंचायत समिती सभागृह मंडणगड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी आमदार योगेश कदम, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.राज्यमंत्री श्री. सत्तार म्हणाले, खार जमीन विकास करण्याच्या दृष्टीने सकारात्मक  पाऊल उचलण्यात येत आहे. हर्णे, बाणकोट, बुरोंडी यासारख्या बंदरांचा विकास करण्यासाठी आवश्यक निधी दिला जाईल. जांभा दगड बंदी उठवण्याबाबतचा अंतिम निर्णय झाला असून लवकरच याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयात येतील  असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. पंचायत समिती मंडणगडच्या प्रशासकीय इमारत बांधकामासाठी तसेच ग्रामीण भागातील जोडरस्ते दुरुस्तीसाठी लवकरच निधी दिला जाईल असेही त्यांनी सांगितले.

No comments