0

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

जीवाची बाजी लावून कर्तव्य निभावणाऱ्या आबा सावंतसारख्या वाहतूक पोलिसांचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. असे गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे काढले.पिंपरी चिंचवड येथे मास्क न घातल्याने एका कार चालकाविरुद्ध कारवाई करत  वाहतूक पोलीस आबा सावंत यांना त्या कार चालकाने बॉनेटवर लटकवून फरफटत नेले. तरीही मोठ्या हिमतीने त्यांनी आपले कर्तव्य पूर्ण केले.त्यांचा सत्कार  शाल व पुष्पगुच्छ देऊन गृहमंत्री महोदयांच्या ज्ञानेश्वरी या शासकीय निवासस्थानी करण्यात आला.यावेळी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, तसेच सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले उपस्थित होते.

Post a comment

 
Top