0

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

कोरोना संकटाच्या या काळात संपूर्ण जगात वैद्यकीय शिक्षणाचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित झाले असून सद्यस्थितीत डॉक्टरांचे काम सर्वात कठीण तर आहेच त्याचबरोबर चांगले डॉक्टर निर्माण करणे ही सुद्धा काळाची गरज आहे. ही गरज लक्षात घेता महाराष्ट्रातील दुर्गम भागात वैद्यकीय शिक्षण संबंधित पायाभूत सुविधा, महाविद्यालये व रुग्णालये विकसित करण्यास महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केले. या अनुषंगाने हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या कामाला गती देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.हिंगोली येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातील बैठक मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, खासदार राजीव सातव, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top