0

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

वन विभागाच्या विविध अडचणींसंदर्भात तसेच वन तलाव, गौण वनोपज या विषयाबाबत मंगळवारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली व वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विभागांतर्गत येणाऱ्या विविध समस्या प्राधान्याने सोडविण्याची सूचना श्री. झिरवाळ यांनी केली.वन विभाग, आदिवासी विकास विभाग व जलसंधारण विभाग यांच्या माध्यमातून वनाचा विकास कसा करता येईल तसेच तेथील स्थानिकांना रोजगार कशा प्रकारे उपलब्ध करुन देता येईल, या‍ विषयी यावेळी चर्चा करण्यात आली. संत तुकाराम वनग्राम योजनेंतर्गत गठित केलेल्या समितीच्या माध्यमातून वृक्ष लागवडीकरिता लोकांना प्रोत्साहित करावे, असेही श्री.झिरवाळ यांनी सांगितले. नाशिकमधील संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमाला चालना देण्याची सूचनाही त्यांनी केली.नाशिक विभागातील मानव आणि बिबट्याच्या संघर्षाबाबत चिंता व्यक्त करुन तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून काय प्रयत्न करण्यात येत आहेत, याबाबत श्री.झिरवाळ यांनी आढावा घेऊन ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आधुनिक साधनांचा वापर करण्याची सूचना केली.

Post a Comment

 
Top