web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड नगरपंचायत आरक्षण सोडतीत अनेकांच्या अपेक्षा भंग ; मात्र,आम्ही लढणार मुरबाड नगरपंचायत...

 

BY - नामदेव शेलार, युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |

गेली पाच वर्षे मुरबाड नगरपंचायतीचा विकास आमदार किसनराव कथोरे यांच्या प्रयत्नाने झाला त्याच पाच वर्षात ज्यांनी भावी नगरसेवकाची स्वप्न पाहिली त्यांच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत.अनेकांचा प्रभाग बदल्याने नव्या चेहर्‍यांना संधी मिळणार असुन शासकीय कार्यप्रणालीवर वचक समाजसेवेचे सुचक आणि बुध्दीमता विकासाचे साक्षीदार अशा उमेदवाराना मतदार संधी देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.केवळ विकास म्हणुन नाहीतर सार्वसामान्याना त्यांच्या समस्या शासनदरबारी मांडुन त्यांना न्याय देण्यासाठी विकासाचं प्रकल्प आराखडे आमदार खासदार शासन यांना समजावुन देण्यासाठी समाजसेवा राजकारण यातील अंतर दाखवुन देण्यासाठी आम्ही मुरबाड नगरपंचायत लस्त आहोत

   खरतर आम्ही दरवेळी नगरपंचायतसह सर्वच निवडणुकीत लस्त असतोच मतदाराना वचननामा उमेदवार यांची ओळख करून देत असतो त्याचं प्रमाणे येत्या निवडणुकीत खेळीमेळीने सुचक वातावरणाने बेधडक बुध्दीने समविचाराने मुरबाड नगरपंचायत लढणार…

मुरबाड नगरपंचायत मध्ये प्रभाग निहाय सोडत संपन्न झाली त्यामध्ये अनेक नगरसेवकाचे प्रभाग बदल्याने त्यांना प्रभाग उरले नाही मात्र राजकीय पक्षाचे नेते जनतेसमोर कोणते उमदेवार देतात हेच पाहाणे उचित ठरणार आहे.त्यांच्या राजकीय तालमीत आम्ही सुध्दा लस्त आहोत मात्र मतदात्याचा मत मोलाचा आहे.याची तयारी आता पासुनच घेणे गरजेचे आहे.मुरबाड नगरपंचायतीचे प्रभाग निहाय सोडत प्रभाग क्र 1 मध्ये पुरूष नगरसेवक होते त्याजागी आता सर्वसाधारण महिला असणार आहे.प्रभाग क्र 2 मध्ये महिला नगरसेवक निवडुण आली होती त्या ठिकाणी नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला असणार आहे.प्रभाग क्र 3 मध्ये महिला नगरसेवीका होती हा प्रभाग आता सर्वसाधारण झाला आहे.प्रभाग क्र 4 मध्ये अनुसुचित महिला प्रभाग क्र 5 महिला प्रभाग क्र 6 मध्ये ना.मा.प्र महिला प्रभाग क्र 7 मध्ये गेल्यावेळीस महिला आरक्षण होते यावेळी ना.मा.प्र.महिला प्रभाग क्र 8 मध्ये महिला आरक्षण होते यावेळी हा प्रभाग सर्वसाधारण झाला आहे.प्रभाग क्र 9 मध्ये ना.मा.प्र महिला झाला आहे.प्रभाग 10 मध्ये सर्वसाधारण प्रभाग 11 मध्ये गेल्यावेळी महिला आरक्षण होते यावेळी सर्वसाधारण पडले आहे.प्रभाग 12 गेल्यावेळी महिला आरक्षण होते यावेळी सर्वसाधारण पडले आहे.प्रभाग 13 गेल्यावेळी महिला आरक्षण होते यावेळी सर्वसाधारण पडले प्रभाग 14 गेल्यावेळी महिला आरक्षण होते यावेळी सर्वसाधारण पडले आहे.प्रभाग 15 सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे प्रभाग क्र 16 यावेळी अनुसुचित जमाती महिला असे पडले असुन प्रभाग क्र 17 शास्त्रीनगर माळीपाडा सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे.म्हणजे एकूण 17 प्रभागात ज्यांनी बांधणी केली भावी नगरसेवक म्हणुन हवा केली आपलं नेतृत्व अखंड राहिल अशी अपेक्षा ठेवुन पक्षाच्या नेत्याना गृहीत धरून येत्या निवडणुकीची तयारी केली त्याची अपेक्षा भंग झाली आहे मा्र आयजीच्या जीवावर बायजी उधारबाजि.ननसेवक अशी स्थिती नेहमी प्रमाणे होणार यात शंका नाही

 

 

No comments