0

 

BY -  युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |

'त्यांचा' सगळा वेळ राजकारणातच असतो, मात्र आम्ही राजकारण निवडणुकीपुरतं करतो, असा टोला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे. कल्याणच्या बहुप्रतिक्षित पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगच्या कामाची पाहणी करण्यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आले होते. यावेळी त्यांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला. महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्या विरोधीपक्षाला त्यांनी लक्ष्य केले. पत्री पुलावरून याआधीही राजकारण झाले आहे. मात्र, आम्ही तसे करणार नाही, असे ठाकरे म्हणाले.

Post a Comment

 
Top