BY - गौरव शेलार ,युवा महाराष्ट्र
लाइव - मुरबाड ,ठाणे
मुरबाड शहरातील रस्त्याच्या कडेला बसून फळभाजी विविध
खाद्य पदार्थ विकणारे फेरीवाले,पथविक्रेते, टोपली धारक,छोटे दुकानदार यांनी
बुधवारी मुरबाड नगर पंचायतीवर लेबर फ्रंटचे संस्थापक अध्यक्ष श्यामदादा गायकवाड
यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड तालुका युनिट प्रमुख रविंद्र चंदने यांच्या
नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी मुरबाड
नगरपंचायत कार्यालयावर हल्लाबोल करीत धडक मोर्चा काढून नगरपंचायत प्रशासनाचा निषेध
केला. फेरीवाल्यांना
प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजना लागू करावी, नगरपंचायत कर्मचाऱ्यांची मनमानी बंद करावी
अशा मागण्यांसाठी लेबरफ्रंटच्या फेरीवाल्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगरपंचायत
कार्यालयावर घोषणाबाजी करीत हल्लाबोल धडक मोर्चा काढला
Post a comment