0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

वनहक्क प्राप्त धारकांना बॅंकेकडून कर्ज मिळणार असल्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. अहमदनगर जिल्ह्यात वनहक्क धारकांना कर्ज मिळण्यात अडचणी येत असल्याने श्री. तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.वैयक्तिक वनहक्क प्राप्त धारकांना बॅंकाकडून कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी शासन परिपत्रक काढण्यात आले होते. मात्र, बॅंका वनहक्क धारकांना कर्ज उपलब्ध करुन देण्यास टाळाटाळ करत असल्याने लाभार्थी कर्जापासून वंचित राहत होता. हे लक्षात घेता आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हाधिकारी, बॅंक व्यवस्थापक आणि आदिवासी विकास विभागांच्या अधिकाऱ्यांना पात्र लाभार्थ्यांना कर्ज देण्याचे निर्देश दिले. शासन बॅंकांना लागणारी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे श्री.तनपुरे यांनी सांगितले. त्यानंतर बॅंकांनी राज्यमंत्र्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे वनहक्क प्राप्त धारकांना बॅंकाकडून कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Post a Comment

 
Top