web-ads-yml-728x90

Breaking News

वर्ष २०१९-२० साठी भविष्य निर्वाह निधी खात्यांची माहिती सेवार्थ संकेतस्थळावर उपलब्ध

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

महाराष्ट्र महालेखापाल (A&E)-१ कार्यालय, मुंबईतर्फे वर्ष २०१९-२० साठी भविष्य निर्वाह निधी (जीपीएफ) खात्यातील जमा रकमेसंबंधी स्लीप लेखा व कोषागरे संचालनालय यांना पाठविण्यात आली असून सदर माहिती महाराष्ट्र शासनाच्या SEVAARTH या संकेतस्थळावर http://sevaarth.mahakosh.gov.in येथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्याची लिंक https://agmaha.cag.gov.in/ या AG कार्यालयाच्या संकेतस्थळावरही देण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनाचे जीपीएफ खाते धारक आपल्या जीपीएफ खात्यासंबंधी वर्ष २०१९-२० या वर्षासाठीच्या स्लीप्स सदर संकेतस्थळावर पाहू शकतात किंवा डाऊनलोड आणि प्रिंट करू शकतात.राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या ११ जून २०२० च्या शासन निर्णय क्रमांक GPF-2019/Pr.Kr.61/Kr.24 अनुसार जीपीएफ विवरणपत्राची हार्ड कॉपी देण्याचे काम थांबविण्यात आले आहे.

No comments