0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक तरुणांचे रोजगार गेले आहेत. या पार्श्वभूमीवर नव्याने रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत त्याप्रमाणे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने नवीन मागणीप्रमाणे तरुणांना प्रशिक्षित तयार करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.वर्षा निवासस्थानी आज कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सादरीकरण झाले त्यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. यावेळी  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सचिव अंशु सिन्हा, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त दिपेद्रसिंह कुशवाह  उपस्थित होते.

Post a comment

 
Top