0

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

थोर गांधीवादी नेते, भूदान चळवळीचे प्रणेते, भारतरत्न, आचार्य विनोबा भावे यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.आचार्य विनोबाजींनी महात्मा गांधीजींच्या सत्य, अहिंसेच्या मार्गानं जात विचार परिवर्तनातून समाजपरिवर्तनाचं अलौकिक कार्य केलं. भूदान चळवळीतून भूमिहिन बांधवांना लाखो एकर जमीन मिळवून दिली. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील महात्मा गांधीजींचे पहिले वैयक्तिक सत्याग्रहीपासून सर्वोदय चळवळीपर्यंतचा त्यांचा प्रवास एका महान संताचा, कृतीशील विचारवंतांचा, प्रखर राष्ट्रभक्ताचा प्रवास आहे. ग्रामविकासातून राष्ट्रविकासाचं त्यांचं स्वप्न पूर्ण करणं, हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आचार्य विनोबाजींना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे.

Post a Comment

 
Top