web-ads-yml-728x90

Breaking News

आधुनिक तंत्रज्ञानाचे स्वागत करताना पाठांतराला दुय्यम समजू नका – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

शैक्षणिक क्षेत्रातही डिजिटल युग आले असले तरी आधुनिक तंत्रज्ञानाचे स्वागत करताना पाठांतराला दुय्यम समजू नये, असे प्रतिपादन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केले.शालेय विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य मराठी  विकास संस्था आणि मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि यांच्या संयुक्त विद्यमाने आज राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली झूम मिटिंगद्वारे झाले.स्पर्धेचा विषय मराठी परंपरा संवर्धनाचा तसेच संस्थेच्या उद्दिष्टांशी पूरक असल्याने राज्य मराठी विकास संस्थेने सह आयोजक या नात्याने या स्पर्धा आयोजनात सहभाग घेतला.

No comments