BY - गौरव शेलार, युवा महाराष्ट्र लाइव
– मामनोली |
कल्याण तालुक्यातील तुषार
दत्तात्रेय कोर यांच्या सामाजिक कार्याची वाटचाल प्रभावी असून त्यांनी आजपर्यंत गोरगरिबांच्या
मदतीला धावून शेकडो गरिबांची छत्रसावली म्हणून छाप पाडली आहे.त्यांनी केलेल्या कार्याचा
डंका ग्रामीण भागात उमटल्याने त्यांच्या कार्याची प्रशंसा ठाणे जिल्हयात होत आहे त्यांच्या
याच कार्याची धडपड आणि निर्भिडता पाहून तुषार दत्तात्रेय कोर यांची भाजपा ओबीसी मोर्चा
ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हा चिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.त्यांच्यावर मोठी जबाबदारी
सोपविण्यात आली असून वरिष्ठ महोदयांना अभिप्रेत असलेले संघटन बनविण्यासाठी तालुक्यातील
सर्वांना एकत्रित करून नव्या दिशेची नवी पहाट म्हणून पक्षाची ध्येय-धोरणे मनात बाळगून
विविध कार्यक्रम राबवितांना सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष मजबुतीसाठी
त्यांची निवड करण्यात आली आहे.तुषार कोर यांच्या निवडीमागील त्यांची भूमिका आणि कार्यशैली
प्रगतशील असल्याचे नागरिकांत बोलले जात असून तुषार कोर यांना मोठी जबाबदारी पार पाडतांना
आम्ही समस्त पदाधिकारी तसेच नागरिक त्यांच्या सोबत असल्याचे यावेळी आमचेशी बोलतांना
सांगितले आहे.तुषार कोर यांचे वडिलांनी देखील आजपर्यंत लोककल्याण केले असून त्यांचा
वारसा तुषार कोर यांनी हाती घेतला असून त्या वारसावर विश्वास असल्याचे आयोजित केलेल्या
कार्यक्रम वेळी मान्यवरांनी व्यासपिठावर सांगितले आहे.तुषार दत्तात्रय कोर यांची निवड
भाजपा ओबीसी मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हा चिटणीस पदी झाल्याने त्यांना पुढिल
वाटचीस शुभेच्छा देण्यासाठी कोकण विभागाचे आधारस्तंभ,ठाणे जिल्हयाचे पालकत्व,मुरबाड
विधानसभा मतदार संघाचे आमदार किसनराव कथोरे यांच्या शुभहस्ते निवड पत्र देण्यात आले.या
वेळी व्यासपिठावर अन्य मान्यवर उपस्थित होते.
Post a comment