मल्टिप्लेक्स सिनेमा संदर्भातील अडीअडचणी सोडविण्याबाबत निश्चित प्रयत्न करणार – मंत्री जयंत पाटील
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
मल्टिप्लेक्स सिनेमा संदर्भातील अडीअडचणी
सोडविण्याबाबत निश्चित प्रयत्न करु, असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.मल्टिप्लेक्स
सिनेमासंदर्भातील विविध अडीअडचणी सोडविण्याबाबत यूएफओ, सिनेपोलीस व इतर
कंपन्यांच्या शिष्टमंडळाने मंत्रालय येथे मंत्री श्री. पाटील यांना निवेदन दिले.मल्टिप्लेक्स
सुरु करताना येत असलेल्या अडचणी, खाद्यपदार्थ थिएटरमध्ये घेऊन जाण्याची परवानगी
तसेच कर परती व इतर अनुषंगिक बाबींबाबत मदत करावी अशा या शिष्टमंडळाच्या मागण्या
आहेत.
No comments